Homeताज्या बातम्या

ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड : देशभरात वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांची दखल घेत केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खा. डॉ. गोपछडे

जागतिक इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन!
कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये
मुखेडच्या मुख्याध्यापकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेबदली करून देणे, नोटीस न देणे आणि ‘हप्ता’ प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
Dr.Ajeet - खा. अजित गोपछडे घेणार देगलूर आणि बिलोली येथील विविध विकास  कामांचा आढावा नांदेड : देगलूर आणि बिलोली या दोन्ही तालुक्यातील केंद्र आणि  ...


नांदेड : देशभरात वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांची दखल घेत केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खा. डॉ. गोपछडे यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे ऑनलाइन औषध विक्रीवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्र्यांनी देशभरातील केमिस्ट व फार्मासिस्ट संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
अलीकडच्या काळात ऑनलाइन खरेदी-विक्रीत मोठी वाढ झाली असून औषधांच्या ऑनलाइन विक्रीचाही विस्तार ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा वापर, उत्तेजक औषधांची सहज उपलब्धता आणि अनियंत्रित विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणार्‍या मोठ्या सवलतींमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत असल्याचेही निदर्शनास आले आहे.  या पार्श्वभूमीवर खा. डॉ. गोपछडे यांनी भाजप केमिस्ट-फार्मासिस्ट सेलचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दुबे यांच्यासह दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नड्डा यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. ऑनलाइन औषध विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार केंद्र सरकारने देशभरातील संबंधित संघटनांची बैठक आयोजित केली असून या बैठकीत ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्याबरोबरच औषध विक्रेत्यांनाही दिलासा मिळेल, असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला.

COMMENTS