Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी सेवक डॉ. पोपेरे पंजाब सरकारकडून सन्मानित 

शहरी व ग्रामीण आदिवासी भागामध्ये समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य करणारे स्व. रुक्मिणीबाई पोपेरे चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर (ठाणे)चे संस्थापक डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना पंजाब सरकारच्या वतीने ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. पोपेरे यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशभर तसेच परदेशातही विस्तारलेले आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवत शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पंजाब सरकारने त्यांना ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण चंदीगड (पंजाब) येथे पंजाब राज्य विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. डॉ. पोपेरे यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. 

औषधनिर्मितीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजे; चेपल्स वैद्यकीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी तज्ञांचे मत
अस्थिविकार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 
भररस्त्यात महिलेच्या प्रसूतीचा थरार; डॉक्टर महिलेने वाचवले मायलेकीची प्राण

शहरी व ग्रामीण आदिवासी भागामध्ये समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य करणारे स्व. रुक्मिणीबाई पोपेरे चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर (ठाणे)चे संस्थापक डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना पंजाब सरकारच्या वतीने ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. पोपेरे यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशभर तसेच परदेशातही विस्तारलेले आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवत शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पंजाब सरकारने त्यांना ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण चंदीगड (पंजाब) येथे पंजाब राज्य विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

डॉ. पोपेरे यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. 

COMMENTS