Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरें

बीडच्या शिक्षणाधिकार्याकडून उच्च न्यायालयाचा अवमानशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिकास उच्च न्यायालयाची नोटीस
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने



महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्ये यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 9 मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, धनादेश अनादर कायद्याची प्रकरणे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मालमत्ता कर प्रकरणे, गुन्हा कबुलीची प्रकरणे, प्रादेशिक परिवहन कार्यालय व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे, सर्व बँकांची प्रकरणे, वित्त कंपन्यांची प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली व दाखलपूर्व प्रकरणे, भारत संचार निगम मर्यादित कंपनीची प्रकरणे, महावितरण कंपनीची प्रकरणे आदी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यासाठी जिल्ह्यात एकूण 30 खंडपीठे तयार करण्यात आली होती. शनिवार, 9 मे रोजी झालेल्या लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यातील न्यायालयातील एकूण 11 हजार 704 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 719 प्रकरणे निकाली निघाली असून जवळपास 5 कोटी 33 लाख 88 हजार 823 रुपयांचे तडजोड मूल्य निश्चित करण्यात आले. मालमत्ता थकबाकी, पाणीपट्टी तसेच दाखलपूर्व दावे यातील  961 प्रकरणे निकाली निघाली असून त्यांचे 2 कोटी 44 लाख 6 हजार 497 रुपयांचे तडजोड मूल्य ठरले. अशा प्रकारे एकूण 1 हजार 680 प्रकरणे निकाली निघाली असून एकत्रित तडजोड मूल्य 7 कोटी 68 लाख 49 हजार 320 रुपये इतके आहे. विशेष म्हणजे, 30 लाख रुपयांचे एक दिवाणी प्रकरणही या राष्ट्रीय लोकअदालतीत निकाली काढण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार, न्यायाधीश व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS