Homeताज्या बातम्या

परळीच्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे १४ ऑगस्टला भूमीपूजन; सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते सोहळा

परळी वै. : परळीच्या विकासात महत्त्वाची भर घालणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामीण पो

पिंपळनेर येथे पीएसआय प्रियंका परदेशी यांचा सत्कार
बीड शहरातील विकासकामांना वेग; क्षीरसागर दाम्पत्याकडून विविध कामांचे भूमिपूजन
इमामपूर रोडवरील कथित अवैध खनन प्रकरण तापले; करोडो रुपयांच्या मुरूम, दगड व वाळू उपशाचा आरोपराजकीय वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही – समाजसेवक इम्रान जागीरदार
Beed news : परळीच्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे १४ ऑगस्टला भूमीपूजन

परळी वै. : परळीच्या विकासात महत्त्वाची भर घालणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील टेकडीवरील मैदानात होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. ५६४ कोटी ५८ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारे हे महाविद्यालय सुमारे ४१ हेक्टर ८० आर जागेवर उभे राहणार आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून पशुवैद्यकीय शिक्षणासोबत पशुधन संशोधन आणि आधुनिक सेवा सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमास आमदार धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे सांगण्यात आले. या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी, पशुपालकांना आधुनिक तांत्रिक सेवा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून परळीचे शैक्षणिक तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील महत्त्व वाढणार आहे.

COMMENTS