Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना मेल आला आहे

राज्यात द्वितीय आलेल्या तनुश्रीचा संस्थेतर्फे सत्कार
चोपड्यात प्रेम संबंधातून दोघांची हत्या.
पंकजा मुंडेच्या ’शिवशक्ती’ यात्रेला सुरुवात

नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना मेल आला आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजता सुरू होणारी सभागृहाची कार्यवाही थांबवण्यात आली होती. दिल्ली विधानसभेत स्निफर डॉग, बॉम्ब शोधक पथक आणि इतर सर्व एजन्सींचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, शोध मोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची कार्यवाही अर्ध्या तासाच्या विलंबाने सुरू झाली. दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी करत म्हटले की, बॉम्ब शोधक पथकाने विधानसभेची सखोल तपासणी केली. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही.

COMMENTS