Homeताज्या बातम्या

लोकमंथन इफेक्ट : राहाता ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था सुरु 

 राहाता : राहाता ग्रामीण रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याबाबतचे वृत्त दैनिक लोकमंथनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत मंगळवारी (दि. ३०) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केली. त्यामुळे उपचारासाठी येणारे तसेच दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प अनेक दिवसांपासून बंद असल्याने रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने हंडा मोर्चा व ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने दखल घेत शुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कार्यान्वित केली.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक दीपक कसबे यांनी या प्रश्नावर प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली होती. राहाता तालुक्यातील चाळीसहून अधिक गावांतील रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालयाबाहेर जावे लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.याबाबत कसबे म्हणाले, “पिण्याचे पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल समाधान आहे. मात्र ही व्यवस्था कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्पाच्या नियमित देखभाल व दुरुस्तीची वार्षिक व्यवस्था तातडीने करण्यात यावी. तोपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू राहील.” दरम्यान, रुग्णालयात पुन्हा स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

शब्बीर जिवंत परतला..! ‘तो’ मृतदेह उकरून ओळख पटविण्याचा प्रयत्न
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत साठ टक्के मतदान
विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  

COMMENTS