Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे अंगावर हळद लागण्यापुर्वीच भावी नवरदेवाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंग

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! हुंड्यासाठी छळ अन् विहिरीत उडी घेऊन शेवट
जामखेडमध्ये नर्सची स्वतःच इंजेक्शन लाऊन आत्महत्या   
पोलीस ठाणी | हिंगोली पोलीस

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे अंगावर हळद लागण्यापुर्वीच भावी नवरदेवाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ता. 5 सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तर एकुलता एक मुलगा गेल्याने गांधीले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील आनंद हरिभाऊ गांधीले (22) हे कुटुंबियांसह राहतात. घरी आई, वडिल असा परिवार असून त्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. आनंद हेच शेती करतात. काही दिवसांपुर्वीच आनंद यांचा विवाह हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथे ठरला होता. मात्र लग्नापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली.

COMMENTS