Homeताज्या बातम्या

भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी

नवी दिल्ली : भारतात प्रथमच डेंग्यू प्रतिबंधासाठी लसीला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय औषध मान्यता प्राधिकरणाने जपानी औषधनिर्माता कंपनीने

शेवगावातील दूध डेअरीवरील कारवाईनंतर गोंधळ
वॉशिंग्टन बनले जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर
आषाढी वारीत सायकल वारीचा उत्साहसात हजार वारकरी सायकलीवरून पंढरीत दाखल
हिंदुस्थानातील पहिल्या डेंग्यूच्या लसीला मंजुरी, 4 ते 60 वर्षांपर्यंतच्या  लोकांना देता येणार | Saamana (सामना)

नवी दिल्ली : भारतात प्रथमच डेंग्यू प्रतिबंधासाठी लसीला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय औषध मान्यता प्राधिकरणाने जपानी औषधनिर्माता कंपनीने विकसित केलेल्या ’क्यूडेंगा’ या लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. ही लस चार ते साठ वर्षे वयोगटातील व्यक्तींना पूर्वी डेंग्यू झाला होता की नाही, याची तपासणी न करता देता येणार आहे.
ही मंजुरी व्यापक वैद्यकीय चाचण्यांतील निष्कर्षांच्या आधारे देण्यात आली आहे. विविध टप्प्यांतील चाचण्यांमध्ये 28 हजारांहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग होता. त्यानंतर लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता लक्षात घेऊन वापरास हिरवा कंदील देण्यात आला आहे. या लसीच्या प्रत्येकी अर्धा मिली इतक्या दोन मात्रा दिल्या जातील. दोन्ही मात्रांमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवण्यात येईल. लस त्वचेखाली टोचून दिली जाणार आहे. ही लस मूळतः जपानमध्ये विकसित करण्यात आली असली, तरी तिचे उत्पादन भारतातच होणार आहे. ’मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत हैदराबादस्थित औषधनिर्मिती संस्थेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार असल्याने देशभरात पुरवठा सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. लसीची विक्री किंमत अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नाही. मात्र, देशांतर्गत उत्पादनामुळे ती सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच बाजारात उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांत लसीच्या परिणामकारकतेवर आणि सुरक्षिततेवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.

COMMENTS