दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी मंगळवारचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन दिग्गज कलाकारांनी रस्ते अपघातात आपला जीव
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी मंगळवारचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन दिग्गज कलाकारांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. मल्याळम अभिनेते संतोष नायर आणि प्रसिद्ध निर्माते आर. बी. चौधरी यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.
उदयपूर येथे त्यांच्या कारला भीषण अपघात झाला, ज्यामध्ये निर्माते आर. बी. चौधरी यांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
आर. बी. चौधरी हे साऊथ सिनेसृष्टीतील एक अतिशय मोठं नाव होतं. तमिळ अभिनेता ‘जीवा’ याचे ते वडील होते. त्यांनी १९८८ मध्ये ‘सुपर गुड फिल्म्स’ या बॅनरखाली चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. तेलुगू, तमिळ आणि मल्याळम, हिंदी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी १०० हून अधिक सिनेमांची निर्मिती केली आहे.
त्यांचा शेवटचा चित्रपट ‘मरिशन’ गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. ‘लव्ह टुडे’, ‘मिस्टर रोमियो’ आणि ‘एसीपी शिवा’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची भेट त्यांनी प्रेक्षकांना दिली. अनेक नवीन कलाकार आणि दिग्दर्शकांना संधी देणारा एक मोठा आधारवड आज कोसळला आहे.
आर. बी. चौधरी यांचे पार्थिव आज चेन्नईला नेले जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या व्यक्तींना गमावल्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

COMMENTS