Homeमहाराष्ट्र

अंथरवन पिंपरी तांडा येथे कृषिदूतांनी जाणून घेतल्या शेतकर्‍यांच्या गरजा; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे दिले प्रात्यक्षिक

बीड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व आदित्य शिक्षण संस्था बीड संलग्नित आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषी संलग्नता उपक्रम २०२६-२७ अं

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय
झारखंडमध्ये पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीजेपीचा पाठिंबा
श्री दत्त संस्थान, बालाघाट येथे गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्याचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय मेजवानी
डिजिटल शेती : स्मार्ट शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान

बीड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व आदित्य शिक्षण संस्था बीड संलग्नित आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषी संलग्नता उपक्रम २०२६-२७ अंतर्गत अंथरवन पिंपरी तांडा येथे कृषिदूतांनी गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध गरजा जाणून घेत संवाद साधला.

यावेळी कृषिदूत आदित्य कुर्‍हे, स्वप्नील शिंदे, आनंत शिंदे, रुधिर आघाव, सचिन वनवे, स्वप्नील काळे, रोहन आकोसकर, विकास पिंपळे, बालाजी पवार व यशपाल ओव्हाळ यांनी शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत शेतीतील प्रत्यक्ष अडचणी समजून घेतल्या. बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, कीड व रोग व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपाय आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान याबाबत कृषिदूतांनी शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

या उपक्रमावेळी अंथरवन पिंपरी तांडा येथील शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी आदित्य कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाचे विषय तज्ज्ञ प्रा. ओ. एन. राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

या कृषी संलग्नता उपक्रमासाठी आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदिती सारडा, आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्यामजी भुतडा, कार्यक्रम समन्वयक डॉ. ब्रह्मदेव मुंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय सातपुते तसेच ग्राम सहवास अधिकारी डॉ. एस. एस. एडके व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

COMMENTS