Homeताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भोकरात उत्साहात ध्वजारोहण; नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन

भोकर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भोकर शहरात विविध ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमांचे

नांदेडच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलभ रोहन; पदभार स्वीकारला
पातळगंगेचे पाणी दूषित; दुर्गंधीने वाढली आरोग्याची चिंता! पाणी स्वच्छ होईपर्यंत स्विमिंग टाळा: डॉ. मुंडे, डॉ. भुमे
माथेरानला ५ एकर पार्किंग आणि नागपूरच्या क्रीडा संकुलाला ४ कोटींचा निधी; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

भोकर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भोकर शहरात विविध ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यात आले.

शास्त्रीनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भगवान दंडवे यांच्या हस्ते अधिकृत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लहुजी साळवे चौकात भोकर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. बोरगाव रोडवरील अण्णाभाऊ चौकातही नगराध्यक्ष भगवान दंडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष दिलीप सोनवडे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर गाडेकर आणि उत्तम बाबळे आदींनी महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे जयंतीचा दिवस ’लेखन दिवस’ म्हणून घोषित केल्याबद्दल शासनाचे स्वागत व अभिनंदन केले. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास पत्रकार डॉ. मनोज गीमेकर, नगरसेवक साईप्रसाद जटलावार, अविनाश दिलीप वाघमारे, यशवंतकर भोकरकर, नगरसेवक प्रतिनिधी दिनेश लक्षटवार, पत्रकार राजेश वाघमारे, नगरसेवक गौतम कसबे, सिद्धेश्वर पिटलेवाड, दिलीप वाघमारे, पांडुरंग वाघमारे, जयंती मंडळाचे मावळते अध्यक्ष अनिल डोईफोडे, पत्रकार अशोक वाघमारे, पत्रकार सुभाष भालेराव, चंद्रकांत बाबळे, बालाजी काळे, महेंद्र किनीकर, रवी किनीकर, गंगाधर करंदीकर, बंटी गायकवाड, ओमश्री मोरे, संतोष अण्णा सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी के. व्ही. देवकांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

COMMENTS