नांदेड: स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७५९
नांदेड: स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि ’समाजभूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक मूल्यांचा संगम घडविणारा हा सोहळा समाजजीवनातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करणारा ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव देवडे लहानकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अजित गोपछडे, सत्कारमूर्ती म्हणून आमदार अमरनाथ राजुरकर तसेच मुख्य अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय गिरडे, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, माजी महापौर किशोर स्वामी यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८ वाजता आयटीआय कॉर्नर येथून शोभायात्रेला प्रारंभ होईल. श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर, राज कॉर्नर, चैतन्यनगर, साईबाबा मंदिर मार्गे ही शोभायात्रा तरोडा (खुर्द) येथील श्री कृष्ण मंगल कार्यालयात पोहोचेल. त्यानंतर दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार यांना ’समाजरत्न’, उद्योजक विठ्ठलराव किवळेकर यांना ’उद्योगरत्न’, डॉ. सुधाकरराव तहाडे, पुंडलिकराव घुमलवाड आणि धनराज शिरूळे यांना ’समाजभूषण’ तर देविदासराव चिलवंतकर यांना ’जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दिगंबरराव विभुते यांनी समाजबांधवांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

COMMENTS