Homeताज्या बातम्या

ट्रक खरेदीच्या व्यवहारात 10 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर : आर्थिक अडचणीमुळे विक्रीस काढलेल्या ट्रकच्या व्यवहारात ठरलेली रक्कम न देता ट्रक घेऊन गेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात

कुकडी, सीना प्रकल्पांचा मंत्री विखे पाटील आज घेणार आढावा
कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील अर्ज न्यायालयाकडून नामंजूर; ॲड. राहुल सोळंके यांनी केली गैरअर्जदाराची बाजू
गणेशनगर कॅम्पसला ‘डॉ. त्रिंबकराव पुरनाळे’ यांचे नाव
Crime News: दिल्ली क्राईम ब्रॅचमधून बोलतोय... सांगत डॉक्टर महिलेची 10  लाखांची फसवणूक

अहिल्यानगर : आर्थिक अडचणीमुळे विक्रीस काढलेल्या ट्रकच्या व्यवहारात ठरलेली रक्कम न देता ट्रक घेऊन गेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, धमकी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 10 लाख 50 हजार रुपयांची रक्कम अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर चांगदेव सानप (वय 35, रा. सानपाडा, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैष्णवी बन, भरत कारभारी बन (दोघे रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) आणि शिवाजी बांगर (रा. सावेडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक (एमएच-15-वाई-7000) त्यांनी टीव्हीएस फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन खरेदी केला होता. मात्र आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी हा ट्रक विकण्याचे ठरविले. या व्यवहारातच त्यांची पुढे फसवणूक झाली.

COMMENTS