Homeताज्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये शुक्रवारी भाजपचा भव्य नागरी सत्कार सोहळा; नवनिर्वाचित आमदारांचा होणार गौरव

अहिल्यानगर : जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा भव्य नागरी सत्कार समारंभ येत्या शुक्रवारी (दि. २६ जून २०२६) भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित

नांदुर्खी येथे आधार नोंदणी व आरोग्य विमा शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक
अवकाळी पावसाने विटभट्टी व्यवसाय उद्ध्वस्त; संगमनेरमध्ये नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी
Rahuri Bypoll Result: Akshay Kardile Wins by 1 Lakh Votes | राहुरीत भाजपचे  अक्षय कर्डिले विजयी

अहिल्यानगर : जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा भव्य नागरी सत्कार समारंभ येत्या शुक्रवारी (दि. २६ जून २०२६) भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग आणि शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.

नुकत्याच पार पडलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार आमदार अक्षय कर्डिले यांनी विजय मिळवला. तसेच विधानपरिषदेत सुनील कर्जतकर, आमदार विवेक कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांची निवड झाली आहे. या सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.

अहिल्यानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी दुपारी ३ वाजता जिल्हा सहकारी बँकेच्या ‘सहकार सभागृहात’ हा सोहळा रंगणार आहे. राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नागरी सत्कार समारंभ संपन्न होईल.

या सत्कार सोहळ्यासाठी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS