Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एलआरपी आयुर्वेद कॉलेजचा 100 टक्के निकाल

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये एलआरपी आयुर

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकेसाठी मागासवर्गीयांचे दहिवडीत बोंबाबोंब आंदोलन
सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर
किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये एलआरपी आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल, पी. जी. इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा 100 टक्के निकाल लागला. तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा 90 टक्के निकाल लागला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, अध्यापक, पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाचा 100 टक्के निकाल लागल्याने आयुर्वेद महाविद्यालयात प्रांगणात जल्लोष केला.
अंतिम वर्षाच्या परिक्षेत कु. भारती प्रकाश म्हस्कर (प्रथम क्रमांक), कु. नेहा अनंत भाटवडेकर (व्दितीय क्रमांक), कु. ऋषीकेश अजित भिलारे (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांनी अनुकमे क्रमांक मिळवले. तर प्रथम वर्षामध्ये परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. स्वागता रविंद्र मोहित (प्रथम क्रमांक), कु. उत्कर्षा विजयकुमार माने (व्दितीय क्रमांक), कु. ऐश्‍वर्या चनबसय्या हिरेमठ (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांनी अनुकमे मिळवला. या दोन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये 49 विद्यार्थ्यांनी विविध विषयात विशेष प्राविण्य मिळवले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलाचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील, अध्यक्ष संजय जाधव, सचिव नितिन भोसले-पाटील, प्राचार्य डॉ. विरेंद्र मिनकिरे, पी. जी. डायरेक्टर डॉ. प्रमोद कणप, संदीप यादव, डॉ. विशाल पाटील, डॉ. मुर्शरफ सय्यद, डॉ. रणजीत मोहिते, डॉ. सोनल शहा, डॉ. दिपककुमर परीडा, डॉ. अमित शेडगे, डॉ. सुनिल वाळवेकर, डॉ. अजित पाटील, डॉ. दिपाली पाटील यांनी अभिनंदन केले.

COMMENTS