Homeताज्या बातम्या

नांदुर्खी येथे आधार नोंदणी व आरोग्य विमा शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राहाता : नांदुर्खी बुद्रुक (ता. राहाता) येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढद

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
‘गणेश’ परिसराच्या वतीने आमदार विवेक कोल्हे यांचा उद्या भव्य नागरी सत्कार
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहात्यात ‘मॅरेथॉन २०२६’ चा थरार; शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

राहाता : नांदुर्खी बुद्रुक (ता. राहाता) येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आधार नोंदणी, दुरुस्ती व आरोग्य विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच माधवराव चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप वाकचौरे यांच्या संकल्पनेतून व आर्थिक सहभागातून आयोजित या शिबिरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.

शनिवार (दि. १३ जून २०२६) व सोमवार (दि. १५ जून २०२६) अशा दोन दिवसांत आयोजित या शिबिरात सुमारे २५० ते ३०० ग्रामस्थांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. यामध्ये नवीन नोंदणी, माहिती दुरुस्ती आणि शासकीय आरोग्य विमा योजनांविषयी नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच माधवराव चौधरी यांनी यापूर्वीही गावात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप, शेतकऱ्यांना केशर आंबा रोपे वितरण, टपाल खात्याद्वारे विमा योजना आणि बचत खात्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नांदुर्खी बुद्रुकच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये सांस्कृतिक भवन, गटार योजना, दलित वस्ती सुधारणा योजना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण यांसारख्या विविध विकासकामांचा समावेश आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सोन्याबापू चौधरी, माजी सरपंच राजेंद्र चौधरी, शिर्डी टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच साई श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालयाच्या प्रतिनिधींनी विशेष सहकार्य केले.

COMMENTS