Homeताज्या बातम्या

उल्हास गिराम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; मच्छिंद्र काळे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड : शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. डॉ. शेख अतिक लतीफ यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘आदर्श आरोग्यदूत जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर
भांडण सोडवायला गेलेल्या निष्पाप तरुणाचा खूनकेज तालुक्यात संतापाची लाट, आरोपींच्या अटकेसाठी रस्ता रोको
मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग; गोतस्करीचा मोठा डाव वडवणी पोलिसांनी उधळला

बीड : शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास नागरिक, युवक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र काळे यांनी केले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये रक्तदान शिबिर हा प्रमुख उपक्रम असणार आहे. ‘सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान’ हे लक्षात घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हे जीवनदायी कार्य हाती घेण्यात आले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. २८ मे) सकाळी १०:०९ वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालयात या भव्य रक्तदान शिबिराची सुरुवात होईल. या शिबिरात बीड शहर व परिसरातील कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मच्छिंद्र काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS