Homeताज्या बातम्या

पाटोदा येथे आमेरखान पठाण यांचा रिसेप्शन सोहळा उत्साहात संपन्न; वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजींची उपस्थिती

पाटोदा : येथील रहिवासी महेबूबखान इस्माईलखान पठाण यांचे चिरंजीव तसेच मोहसीनखान पठाण (पोलीस) आणि हमीदखान पठाण यांचे लहान बंधू आमेरखान पठाण यांचा शु

सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश
सामाजिक कार्याची दखल; शांताराम गणेश खुडे यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 जाहीर
वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सोलर पंपाच्या प्लेटचे मोठे नुकसान

पाटोदा : येथील रहिवासी महेबूबखान इस्माईलखान पठाण यांचे चिरंजीव तसेच मोहसीनखान पठाण (पोलीस) आणि हमीदखान पठाण यांचे लहान बंधू आमेरखान पठाण यांचा शुभविवाह रिसेप्शन सोहळा पाटोदा येथील रोहीदास मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला.

या सोहळ्यास विविध राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून नवदाम्पत्याला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रामुख्याने वक्फ बोर्डाचे राज्यमंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष मा. समीर काजी साहेब यांनी विशेष उपस्थिती लावून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्याला पठाण परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.

COMMENTS