Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुरावस्थेत सापडलेले शासकीय अध्यापक महाविद्यालय; मद्यपींच्या विळख्यात शैक्षणिक परिसर

नांदेड : नांदेड शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय (बी.एड.) सध्या गंभीर दुर्लक्ष आणि अव्यवस्थेच्या गर्तेत सापडले असून, एकेकाळी गुणवत्तापूर्ण शिक्

सुरांची सम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन;14 भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गाण्यांचा विक्रम
भारतीय चित्रपट सृष्टीतील वैविध्याचा सूर हरपला !
स्वरसम्राज्ञी अंतर्धान! आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन
शासकीय बी. एड. महाविद्यालये - नांदेड - Justdial

नांदेड : नांदेड शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय (बी.एड.) सध्या गंभीर दुर्लक्ष आणि अव्यवस्थेच्या गर्तेत सापडले असून, एकेकाळी गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविणारी ही ऐतिहासिक संस्था आज अस्तित्वासाठी झुंज देताना दिसत आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करणार्‍या या महाविद्यालयाची सध्याची अवस्था पाहता विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्यालयाच्या इमारतीची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. अनेक वर्गखोल्यांच्या भिंतींना मोठे तडे गेले असून छताच्या भागातून प्लास्टर कोसळत आहे. पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी गळती होत असल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत होते. काही ठिकाणी विजेच्या तारा उघड्यावर असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असून दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना व कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग साचलेले असून नियमित साफसफाईचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, महाविद्यालय परिसरातील वाढलेल्या झाडाझुडपांचा गैरफायदा घेत काही असामाजिक घटक सायंकाळच्या वेळी येथे मद्यप्राशन करत असल्याचे उघड झाले आहे. परिसरात ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि घाण पसरलेली दिसून येते. विशेषतः वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. सुरक्षेअभावी विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. महाविद्यालयाच्या या गंभीर अवस्थेकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

COMMENTS