Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरांची सम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन;14 भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गाण्यांचा विक्रम

मुंबई : भारतीय चित्रपटसंगीताला आपल्या विलक्षण आवाजाने अमिट ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी मुंबईत निधन झाले. त्या 9

स्वरसम्राज्ञी अंतर्धान! आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन
भारतीय चित्रपट सृष्टीतील वैविध्याचा सूर हरपला !
दुरावस्थेत सापडलेले शासकीय अध्यापक महाविद्यालय; मद्यपींच्या विळख्यात शैक्षणिक परिसर
Asha Bhosle dies at 92; A look at melody queen's iconic songs through  decades that changed Indian music forever | Hindustan Times

मुंबई : भारतीय चित्रपटसंगीताला आपल्या विलक्षण आवाजाने अमिट ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी मुंबईत निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना शनिवारी सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्‍वाने एक बहुआयामी, प्रयोगशील आणि अजरामर आवाज गमावला आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी यांनी सांगितले की, आशा भोसले यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या आणि मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले. डॉ. प्रतीक समदानी यांनी सांगितले की, आशा भोसले यांना मल्टी-ऑर्गन फेल्युअरचा त्रास होता, म्हणजेच त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीबाबत आश्‍वासक माहिती समोर येत होती. कुटुंबीयांनी केवळ थकवा आणि छातीत त्रास असल्याचे सांगितले होते; मात्र परिस्थिती झपाट्याने गंभीर होत गेली. अखेरीस वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद न देता त्यांचे निधन झाले. आशा भोसले यांचा संगीतप्रवास सहा दशकांहून अधिक काळ पसरलेला होता. त्यांनी 12 हजारांहून अधिक गीते गायली असून, 14 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी आपला स्वर उमटवला. हिंदी, मराठीसह विविध प्रादेशिक भाषांतील गाण्यांमुळे त्यांची लोकप्रियता देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली. दम मारो दम, पिया तू अब तो आजा, चुरा लिया है तुमने यांसारखी गीते आजही रसिकांच्या ओठांवर ताजी आहेत. त्या प्रख्यात गायक-अभिनेते दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी होत. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि पुढे त्या संघर्षातूनच घडत गेल्या. वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. अल्पवयात केलेले पहिले लग्न यशस्वी ठरले नाही. संसारातील ताणतणाव आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. अखेरीस त्यांनी त्या नात्यापासून वेगळे होत आपल्या मुलांसह नव्याने आयुष्य उभारले. या काळात कुटुंबीयांशी असलेला दुरावाही हळूहळू कमी झाला. संगीताच्या प्रवासात त्यांना अनेक दिग्गज संगीतकारांची साथ लाभली. ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन, खय्याम आणि बप्पी लहरी यांच्यासोबत त्यांनी असंख्य गाणी साकारली. विशेषतः आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी अत्यंत गाजली.

आज होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असून त्यांचे पुत्र, आनंद भोसले यांनी सांगितले की, त्यांच्यावर आज सोमवारी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहे. ज्यांना अंत्यदर्शन घ्यायचे आहे ते सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या घरी येऊ शकतात.


सुरांची सुंदर बाग उजाड झाली : मुख्यमंत्री फडणवीस
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या आशाताईंच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

COMMENTS