Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक

नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

बिलोली तालुक्यातील अवैध रेती प्रकरण; अंदाज समितीच्या निर्देशांवर संशय, कारवाईच्या मागणीसाठी अमरण उपोषण तिसर्‍या दिवशी
अंदाज समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष? बिलोलीतील अधिकार्‍यांच्या निलंबनास विलंब; नांदेड दौर्‍याच्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह
ओव्हरलोडिंग धोकादायक; अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
Dr Shrikant Eknath Shinde (@DrShrikantEknathShinde) • Facebook

नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच अनुषंगाने आज दि.13 एप्रिल रोजी शिवसेनेचे संसदीय गटनेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी तीन वाजता ब्लेसिंग्स बँक्वेट हॉल भारत ई-स्क्वेअर च्या खाली कॅनॉल रोड नांदेड येथे पार पडणार्‍या या बैठकीस राज्याचे मंत्री उदय सामंत , मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर , मंत्री संजय शिरसाट , अंदाज समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर , आ. संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे . या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी , सर्व आजी-माजी पदाधिकार्‍यांनी , शिवसेनेच्या सर्व शाखांचे प्रमुख आणि सर्व आजी – माजी पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नामदार हेमंतभाऊ पाटील , आ. बालाजीराव कल्याणकर , आ. आनंदराव पाटील बोंढारकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले असून बैठकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे , जिल्हाप्रमुख विविध देशमुख हे परिश्रम घेत आहेत.

COMMENTS