Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विहिंप व समरसता मंच पदाधिकारी पोहोचले अशोक गायकवाडांच्या घरी

देशासमोरील विविध समस्यांवर झाली चर्चा

अखिल भारतीय केंद्रीय विश्‍व हिंदू परिषदेचे महामंत्री व नवी दिल्लीतील समरसता मंचाचे प्रमुख देवजीभाई रावत (गुजराथ) तसेच महाराष्ट्र व गोवा राज्य समरसता

Ahmednagar : सार्वजनिक जागा व रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी l Lok News24
’शुक्र तीर्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
अखिल भारतीय केंद्रीय विश्‍व हिंदू परिषदेचे महामंत्री व नवी दिल्लीतील समरसता मंचाचे प्रमुख देवजीभाई रावत (गुजराथ) तसेच महाराष्ट्र व गोवा राज्य समरसता मंच आणि विश्‍वहिंदू परिषदेचे प्रमुख गणेश मोकाशी यांना युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ’मूक नायक’ हा ग्रंथ भेट दिला.

अहमदनगर/प्रतिनिधी – युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व राज्यातील रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड(Ashok Gaikwad) यांची सदिच्छा भेट नुकतीच विश्‍व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता मंचाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली. गायकवाड यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत देशासमोरील विविध समस्या, सामाजिक व राजकीय भूमिकांवर चर्चा झाली. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड यांची घेतलेली भेट रिपब्लिकन चळवळ व संघ वर्तुळात चर्चेची झाली आहे. अखिल भारतीय केंद्रीय विश्‍व हिंदू परिषदेचे महामंत्री व नवी दिल्लीतील समरसता मंचाचे प्रमुख देवजीभाई(Devjibhai Rawat) रावत (गुजराथ) तसेच महाराष्ट्र व गोवा राज्य समरसता मंच आणि विश्‍वहिंदू परिषदेचे प्रमुख गणेश मोकाशी(Ganesha Mokashi) यांनी गायकवाड यांच्या टीव्ही सेंटर रोडवरील निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी मुकुल गंधेंसह जिल्ह्यातील विश्‍वहिंदू परिषद व समरसता मंचाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी रावत व मोकाशी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ’मूक नायक’ हा ग्रंथ भेट दिला.

विविध समस्यांवर झाली चर्चा– सुमारे दोन-अडीच तासांच्या या भेटीत गायकवाड यांची रावत व मोकाशी यांच्याशी देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रश्‍नांवर चर्चा झाली. श्रीमंतांसाठीचे सर्व सुविधांयुक्त शिक्षण एकीकडे व दुसरीकडे गरीबांच्या शिक्षण सुविधेत बसण्यासाठीची बाकडे व डोक्यावरील छताचा असलेला अभाव, गरीबांना रोजगाराभिमुख शिक्षणाची नसलेली सुविधा, शासकीय नोकर्‍यांतून वाढते खासगीकरण व लेबर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने गरीब कामगारांना पुरेसे मिळत नसलेले उत्पन्न, त्यांच्या मुलांना त्यातून मिळत नसलेल्या मूलभूत बाबी, खासगी कंपन्यांतून आरक्षणास होत असलेला विरोध, विकासाच्या नावाखाली कोट्यवधीचा चुराडा होऊनही नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या झोपडपट्ट्या, आरोग्य सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्‍न यावेळी गायकवाड यांनी रावत व मोकाशी यांच्यासमोर मांडून विश्‍व हिंदू परिषद व समरसता मंचाच्या राष्ट्रीय स्तरावर शासकीय योजनांचे वास्तव पोहोचवण्याची मागणी केली. त्यांच्या या सूचनेस दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या वास्तवावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवण्याची ग्वाही दिली.

शिर्डीची सुरू झाली चर्चा – कधीकाळी रिपब्लिकन पक्षाचे नेते व विद्यमान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे खंदे समर्थक असलेल्या गायकवाड यांनी आठवलेंना रामराम ठोकून स्वतंत्र युनायटेड रिपब्लिकन पक्ष स्थापन केला आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी घरी येऊन त्यांची भेट घेतली व चर्चा केल्याने 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीच्या राखीव मतदारसंघात गायकवाडांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती मिळते काय, अशी चर्चाही सुरू झाली आहे. यावर खुद्द गायकवाड यांनी मात्र भाष्य केले नाही व ती फक्त सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या आगळ्यावेगळ्या भेटीची संघ व रिपब्लिकन वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS