Homeताज्या बातम्या

साईचरणी तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान; शिर्डीमध्ये गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा!

शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दि. २८ जुलै २०२६ ते शुक्रवार दि. ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या

कोचिंग क्लासेसच्या विळख्यात कनिष्ठ महाविद्यालये; शिक्षणाचा बाजार आणि प्रशासनाचे मौन!नामधारी कॉलेजांचा सुळसुळाट, गुणवत्तापूर्ण महाविद्यालये मात्र विद्यार्थ्यांविना; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर संकटाकडे शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष
पारधी समाजातील महिलेवर जीवघेणा हल्ला; विनयभंग, लूट व बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप
रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
Donations worth Rs 7.81 crores were made to Saicharani in 3 days during  Guru Purnima festival, donations in Shirdi were 1.5 crores more than last  year, more than 3 lakh devotees

शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दि. २८ जुलै २०२६ ते शुक्रवार दि. ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये तब्बल ७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ रुपयांची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः ३ लाखांहून अधिक साईभक्तांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे १ लाख ९४ हजार २८५ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा, तर ३९,६११ जणांनी अन्नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. याशिवाय दर्शन रांगेत १ लाख ६५ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. तसेच या तीन दिवसांच्या कालावधीत ७१ लाख ७ हजार ३६० रुपये सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकीटांच्या माध्यमातून संस्थानला प्राप्त झाले.

उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारवती निवासस्थान, साई आश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबरच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपांमध्ये मुक्कामाचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागांतून आलेल्या ३९ पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांची उत्तम निवास व्यवस्था करण्यात आली होती, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले.

देणगीचे स्वरूप:

  • रोख (हुंडी पेट्या): २ कोटी ४ लाख ३५ हजार ५५७ रुपये
  • देणगी काऊंटरवर: १ कोटी २५ लाख ४७ हजार ९३५ रुपये
  • पीआरओ (PRO) देणगी: ८७ लाख १४ हजार रुपये
  • ऑनलाइन / इतर माध्यमे: २ कोटी ७ लाख ८४ हजार ७०१ रुपये
  • परकीय चलन: ५ लाख ६५ हजार ९९१ रुपये
  • सोने: १,१२५.५७० ग्रॅम (मूल्य: १ कोटी ४६ लाख ७४ हजार ५४४ रुपये)
  • चांदी: २,३७६.५०० ग्रॅम (मूल्य: ३ लाख ९० हजार ६४९ रुपये)

COMMENTS