Homeताज्या बातम्या

सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; मुंबई सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ८० रुपयांवर

मुंबई : सराफा बाजारात काही दिवसांच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धा

महागाईचा झटका! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती सिलिंडरचे दर ‘जैसे थे’
पॉलिमर नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार; कागदी नोटा फाटणे, झिजणे यामुळे चलनातून बाद होण्याचा धोका
अमेरिकेकडून भारतासह ६० देशांवर आयात शुल्काचा प्रस्ताव; जबरदस्तीच्या मजुरीतून तयार वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध नसल्याचा ठपका
Gold-Silver Price : सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण... जळगावमध्ये आता काय  स्थिती ?

मुंबई : सराफा बाजारात काही दिवसांच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील चढ-उतार तसेच गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी, यामुळे दरात ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा (१० ग्रॅम) सुमारे १ लाख ४९ हजार ८० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि गुजरातसह देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर वधारले आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, आठवड्याच्या अखेरीस सराफा बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे.

COMMENTS