Homeताज्या बातम्या

वाराणसीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड

वाराणसी : वाराणसी येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थिनीचा मृतद

नांदेडमध्ये धक्कादायक घटना: मुलाने केली जन्मदात्या आईची निर्घृण हत्या, नंतर स्वतः घेतला गळफास
शिवसेना नगरसेवकाची डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
रस्ता ओलांडताना मोबाईल वापरण्याची चूक बेतली जीवावर; विजयवाड्यात बसने चिरडल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर!
Varanasi Nursing Student Death | Rape Postmortem Report Revelation

वाराणसी : वाराणसी येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहाच्या (हॉस्टेल) जिन्यावर आढळून आल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला खुनाचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, शवविच्छेदन (पोस्टाॅर्टम) अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे.

अहवालानुसार, गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता खून, लैंगिक अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली गुन्ह्याची व्याप्ती वाढवली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या क्रूर घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS