Homeताज्या बातम्या

महागाईचा झटका! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती सिलिंडरचे दर ‘जैसे थे’

मुंबई : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक (कमर्शिअल) गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून

पॉलिमर नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार; कागदी नोटा फाटणे, झिजणे यामुळे चलनातून बाद होण्याचा धोका
अमेरिकेकडून भारतासह ६० देशांवर आयात शुल्काचा प्रस्ताव; जबरदस्तीच्या मजुरीतून तयार वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध नसल्याचा ठपका
सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; मुंबई सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ८० रुपयांवर
Commercial LPG Rates Increased, Domestic Cooking Gas Prices Unchanged

मुंबई : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक (कमर्शिअल) गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून, घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत. आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून कमर्शिअल सिलिंडरच्या किमतीत तब्बल १,३७३ रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये मागील महिन्यात झालेल्या ९९३ रुपयांच्या मोठ्या वाढीचाही समावेश आहे. या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर या काळात फक्त ६० रुपयांनी वाढले आहेत.

१९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. दुसरीकडे, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर ९१३ रुपयांवर स्थिर आहे. अहमदाबादमध्ये घरगुती सिलिंडर ९२० रुपये, तर जयपूरमध्ये ९१६.५ रुपयांना मिळत आहे.

छोट्या सिलिंडरचे नवीन दर:

  • ५ किलोचा छोटा घरगुती सिलिंडर: ३३९ रुपये
  • १० किलोचा एक्स्ट्रालाइट सिलिंडर: ६५२ रुपये
  • ५ किलोचा व्यावसायिक सिलिंडर (रिफिल): ८२१.५० रुपये (नवीन सिलिंडर: १,७६५.५० ते १,७७९.५० रुपये)
  • २ किलोचा एफटीएल सिलिंडर (रिफिल): ३५४.५० रुपये (नवीन सिलिंडर: १,०६२.५० रुपये)

चौकट: कारखाने आणि मोठ्या उद्योगांसाठीचे सिलिंडरही महागले मोठ्या उद्योगांमध्ये वापरले जाणारे सिलिंडर आज १०५ रुपयांनी महागले आहेत. ४७.५ किलोचा सामान्य सिलिंडर आता ७,७७९.५० रुपयांना मिळणार आहे. तर ४७.५ किलोचा ‘इंडेन एक्स्ट्रातेज’ सिलिंडर ७,८३६ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, ४२५ किलोच्या महाकाय सिलिंडरची किंमत ६९,६५१ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

COMMENTS