Homeताज्या बातम्या

सद्गुरू किसान बाबा व नवनाथ बाबा यांचे अनंत उपकार-ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळेश्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमेनिमित्त हरिकीर्तन उत्साहात संपन्न

संत हे संपूर्ण जगावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करतात. आई-वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात, मात्र संतांचे प्रेम हे सर्व चराचरावर असते. याचे मूर्तिमंत

साक्षात भगवंताला कीर्तनासाठी उभे केले ही किमया माऊली दादाची-मुंडे महाराज शास्त्रीहरी कीर्तनाने भक्तिमय झाली चाकरवाडी
शेवगावमध्ये २९ मे पासून श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथा सोहळा
संतांच्या विचारात मानवी जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सामावलेलेबीडच्या कीर्तन महोत्सवात सोपान महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य निरूपण



संत हे संपूर्ण जगावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करतात. आई-वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात, मात्र संतांचे प्रेम हे सर्व चराचरावर असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वै. सद्गुरू किसान बाबा महाराज व गुरुवर्य शांतिब्रह्म नवनाथ बाबा महाराज होय. साधू-संत हे कोणताही स्वार्थ न ठेवता, न सांगता आणि न दाखवता समाजावर प्रेम करतात. सद्गुरू किसान बाबा व गुरुवर्य शांतिब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचे जनसामान्यांवर अनंत उपकार आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळे यांनी केले.
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आयोजित हरिकीर्तन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग – काय सांगू आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥ काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेविता हा पायी जीव थोडा ॥ हा अभंग निरूपणासाठी घेतला. अभंग विवेचन करताना ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळे म्हणाले की, संतांचे उपकार हे शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. संत आपल्याला जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात, सद्विचार देतात आणि अध्यात्माची वाट दाखवतात. या संतांच्या उपकारातून उतराई होणे कठीण आहे. सद्गुरू किसान बाबा महाराज व गुरुवर्य शांतिब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचेही समाजावर असेच अनंत उपकार आहेत. त्यांचे ऋण फेडण्यासाठी भक्ती, सेवा आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. प्रतिपौर्णिमेप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सद्गुरू किसान बाबा महाराज यांचे मूळ गाव मानकुरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची पंगत आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील टाळकरी, माळकरी, भजनी मंडळी, गायनाचार्य, वाद्याचार्य, मृदंगाचार्य तसेच हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

COMMENTS