Homeताज्या बातम्या

मुंबईतील रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादात मनसेची उडी; दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवण्याची महानगरपालिकेची मोहीम

मुंबई : मुंबईतील काही भागांत धार्मिक कारणांसाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय पातळीवर पोह

अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ रिक्त पदे भरा; आमदार रईस शेख यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका
ओबीसींचे हित राखत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे आंदोलन गुंडाळले! फडणवीसांचे मुत्सद्दी नेतृत्व पुन्हा सिद्ध

मुंबई : मुंबईतील काही भागांत धार्मिक कारणांसाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय पातळीवर पोहोचला आहे. घाटकोपर परिसरातून सुरू झालेला हा विषय दादरपर्यंत पोहोचल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) यावर तीव्र आक्षेप घेतला असून, त्यानंतर महानगरपालिकेने संबंधित पट्टे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

दर पश्चिमेतील बाबरेकर मार्गावर काढण्यात आलेले पांढरे पट्टे तातडीने हटवावेत, अशी मागणी मनसेने केली होती. यासाठी पक्षाकडून मुदत देण्यात आली होती; अन्यथा कार्यकर्ते स्वतः आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रंग काढण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणावर विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शहरातील सर्व समाजांमध्ये सलोखा टिकवण्याची गरज व्यक्त करत या वादामागील कारणांचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

हा वाद नेमका कशामुळे निर्माण झाला, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर-विद्याविहार परिसरातील एका गृहनिर्माण संकुलाजवळ जैन धर्मगुरू आणि साध्वी यांच्या आगमनाच्या निमित्ताने रस्त्यावर पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती. धार्मिक परंपरेचा भाग म्हणून ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी सार्वजनिक जागेचा अशा प्रकारे वापर करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. या विषयाला व्यापक प्रसिद्धी मिळण्यात सोशल मीडियावरील काही व्हिडिओंचाही मोठा वाटा होता. सार्वजनिक जागांमध्ये कोणत्याही एका समुदायासाठी स्वतंत्र चिन्हांकन करणे योग्य नसल्याची भूमिका अनेकांनी मांडली. त्यानंतर या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. घाटकोपरनंतर दादर परिसरातही अशाच प्रकारचे पांढरे पट्टे आढळल्याने वाद अधिक तीव्र झाला. जैन मंदिराजवळील रस्त्यांवर काढण्यात आलेल्या या पट्ट्यांबाबत मनसेने ‘सार्वजनिक रस्त्यांचा वापर सर्वांसाठी समान असावा’ अशी भूमिका घेत प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. वाद वाढू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महानगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करत संबंधित चिन्हांकन हटवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संभाव्य तणाव टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पांढऱ्या पट्ट्यांचा वाद नेमका कशामुळे? मुंबईत कबुतरखान्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत असताना पुन्हा एकदा घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास एव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आली होती. धार्मिक परंपरेनुसार या पट्टीवरून धर्मगुरूंची वर्दळ व्हावी, या उद्देशाने ती आखण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक जागेवर कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्याने या संपूर्ण प्रकाराला विरोध वाढताना दिसून येत आहे.

COMMENTS