Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकेसाठी मागासवर्गीयांचे दहिवडीत बोंबाबोंब आंदोलन

म्हसवड / वार्ताहर : मयत व्यक्तीच्या नावे संगनमताने कागदपत्र बनवणे मुळ कागद पत्राची छेडछाड करणे व बोगस आधारकार्ड प्रतिज्ञा पत्र तयार करुन जमिन हडप

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंना यांना नरेंद्र मोदींची आदरांजली
तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता
यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती

म्हसवड / वार्ताहर : मयत व्यक्तीच्या नावे संगनमताने कागदपत्र बनवणे मुळ कागद पत्राची छेडछाड करणे व बोगस आधारकार्ड प्रतिज्ञा पत्र तयार करुन जमिन हडप करण्याचे कारस्थान करुन गुन्हा दाखल झालेल्या आ. गोरे यांना अटक करावी. यासाठी दहिवडी, ता. माण येथे तहसिल कार्यालयात किशोर सोनवणे व दिलीप तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीयांचे बोंबाबोब आंदोलन करण्यात आले
भाजपचे माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती विरोधी कायद्यांतर्गत दहिवडी पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अध्यापही त्यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली नाही. सामान्य माणसाला वेगळा न्याय व आमदारांना वेगळा न्याय? ही भूमिका योग्य नाही. असे सामाजिक कार्यकर्ते दिलीप तुपे व किशोर सोनवणे यांनी स्पष्ट केले.
मौजे मायणी, ता. खटाव येथील महादेव भिसे यांचे वडील पिराजी विष्णू हे सन 2016 मध्ये मयत झाले होते. तरीही त्यांच्या जागी कोणीतरी अज्ञात
व्यक्ती उभी करून त्याचे बनवट आधार कार्ड बनवून घेतले आहे. आ. जयकुमार गोरे व त्यांचे इतर कार्यकर्त्यांनी 100 रु. च्या स्टॅम्प पेपरवर बोगस प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. पिराजी भिसे यांच्या मूळ आधार कार्डमध्ये छेडछाड करून बनावट आधार कार्ड बनवून भिसे कुटुंबियांची फसवणूक केली आहे. आ. गोरे व त्यांचे सहकारी यांचेवर अनुसूचित जाती व जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप आ. गोरे यांना अटक
झाली नाही. त्यामुळे दलित व बहुजन समाजाला दहिवडी येथील माण तहसील कार्यालयावर आंदोलन करावे लागले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस यंत्रणेने आरोपींना अटक करून आपल्या वर्दीची शान वाढवावी तसेच सिंघम असल्याचे दाखवून द्यावे. त्यामुळे सामान्य जनतेला पोलिसांबद्दल जास्त आधार वाटले, अशी भावना व्यक्त केली जात आहे. या आंदोलनात किशोर सोनवणे, दिलीप तुपे, संभाजी लोखंडे, मोतीलाल खंदारे, सचिन शिंदे, सुरेश सोनवणे, प्रकाश लोखंडे, धनाजी शिंदे, रामचंद्र सोनवणे, राजकुमार खंदारे यांच्या निवेदनावर सह्या आहेत. दरम्यान, निवडणुकीत मागासवर्गीय वाड्यावस्त्या पिंजून काढणार्‍या इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रश्‍नांबाबत मौन धारण केल्याने मागासवर्गीय सामाजिक कार्यकर्त्याना न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. हे या निमित्त दिसून आले आहे.

COMMENTS