Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव

  जालना प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून
मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात
मनोज जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण सुरु

  जालना प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत असल्याने सरकारसमोर देखील मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या पाच दिवसांपासून जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांची तब्बेत खालावली आहे. दरम्यान आज मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोशल मीडियावरून महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. त्यामुळे या बंदला राज्यातील अनेक भागात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान समाजाने शांततेत आंदोलन करावं असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. तसेच जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी त्यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांचा हात जरांगे यांनी झटकला. तपासणी करण्यासाठी जरांगे यांनी नकार दिला आहे. 

COMMENTS