Homeताज्या बातम्या

गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ७.५० लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

गेवराई: अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत सिंदफणा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे व

सह्याद्री गेस्ट हाऊससह शासकीय बंगल्यांची कामे न करताच कोट्यवधींची बिले काढत भ्रष्टाचाराचा विक्रम; मलबार हिल पीडब्ल्यूडी विभागातील मोठे रॅकेट उघड
शिर्डीत ‘अन्नभेसळ’कडून हजारो किलो माल नष्ट; मिठाई व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव
गेवराई : चंदन साठ्यावर राजपिंप्री येथे स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

गेवराई: अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत सिंदफणा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर गेवराई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. त्यानुसार २४ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास मौजे टाकळगाव शिवारातील सिंदफणा नदीपात्रातील बंधार्‍याजवळ पोलिसांनी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान एका ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये नदीपात्रातून काढलेली वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत न्यू हॉलंड कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेल्या वाहनाची आणि ट्रॉलीची एकूण किंमत सुमारे ७.५० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शासनातर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून संबंधित आरोपीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह कल्याण राठोड, गोरक्ष डोके आणि जितेंद्र ओव्हाळ यांनी सक्रिय सहभाग घेतला. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधातील अशा कारवाया पुढेही तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

COMMENTS