Homeताज्या बातम्या

तीन वर्षांनंतर चोरीची ६८ हजारांची रोकड परत; शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

बीड: जिल्ह्यात जप्त मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी २०२३ मधील घरफोडी

कर्नाटकात आढळले ७००० विद्यार्थी एचआयव्ही बाधित; सरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती मोहीम
पत्रकार सुभाष शिंदे यांचे दुःखद निधन
नीट प्रकरणावरून मुंबईत २६ जुलैला मोर्चाची हाक; विद्यार्थी-पालकांनी सहभागी होण्याचे ठाकरे बंधूंचे आवाहन

बीड: जिल्ह्यात जप्त मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी २०२३ मधील घरफोडीच्या गुन्ह्यातील ६८ हजार रुपयांची रोख रक्कम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादीला परत केली आहे. तीन वर्षांनंतर आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

पर्णकुटी कॉलनी, भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरातील रहिवासी तथा निवृत्त ज्येष्ठ नागरिक शेषराव हरिभाऊ हिवराळे (वय ६५) यांच्या घरी २०२३ मध्ये घरफोडी झाली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी राम बन्सी नवले (रा. आहेर धानोरा, जि. बीड) याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, बीड यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेली ६८ हजार रुपयांची रक्कम फिर्यादी शेषराव हिवराळे यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिला पोलीस अंमलदार सीमा रोहिदास गायकवाड आणि रामलीला काशिनाथ गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या कारवाईमुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

COMMENTS