Homeताज्या बातम्या

अ‍ॅड. यदुपत अर्धापूरकर यांना ‘डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर; १ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणार वितरण

नांदेड: साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवानिमित्त समाजातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्या

कोपरगावात दोन दिवसीय मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप शिबिराचे आयोजन; आमदार आशुतोष काळे यांची माहिती
कुंडलवाडीच्या भूमिपुत्राची मोठी झेप; सुदर्शन होनवडजकर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कड्यात शांततापूर्ण निषेध रॅली; पोलिसांना निवेदन

नांदेड: साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवानिमित्त समाजातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार-२०२६’ यंदा नांदेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. यदुपत श्यामसुंदर अर्धापूरकर यांना जाहीर झाला आहे. सामाजिक बांधिलकी, लोकहिताची भूमिका आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३५ वाजता नांदेड येथील साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे आयोजन लहुजी साळवे युवक संघ, नांदेड आणि साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

समाजप्रबोधन, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाच्या विचारांना प्रेरणा देणार्‍या या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अ‍ॅड. यदुपत श्यामसुंदर अर्धापूरकर यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून कायदा, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या कार्याचा हा योग्य सन्मान असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

COMMENTS