आधीच महागाईने तोंडात पाणी आणले आहे, त्यात आता रोजच्या प्रवासासाठी लागणारे पेट्रोल-डिझेलही आवाक्याबाहेर चालले आहे. सरकारने यावर काहीतरी नियंत्रण आ

आधीच महागाईने तोंडात पाणी आणले आहे, त्यात आता रोजच्या प्रवासासाठी लागणारे पेट्रोल-डिझेलही आवाक्याबाहेर चालले आहे. सरकारने यावर काहीतरी नियंत्रण आणायला हवे.
– स्थानिक वाहनधारक, सिरसाळा गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडवले असून आता इंधन दरवाढीने त्यात आणखी भर पडली आहे. सिरसाळा व परिसरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे वाहनधारक, शेतकरी, मालवाहतूकदार आणि नोकरदार वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिरसाळा येथे आज इंधनाचे दर पुढीलप्रमाणे आहेत : पेट्रोल : 109.53 प्रति लिटर डिझेल : 96.08 प्रति लिटर डिझेलचे दर 96 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे मालवाहतूक व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम आगामी काळात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, वाहतूक खर्च आणि प्रवासी भाडेवाढीवर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे, पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे रोज प्रवास करणारे दुचाकीस्वार, नोकरदार आणि लहान व्यवसायिकांचे मासिक बजेट कोलमडत असल्याचे चित्र दिसत आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणार्या नागरिकांना आता इंधन दरवाढीचा अतिरिक्त फटका बसत आहे. बजेट कसं सांभाळायचं? असा प्रश्न आता सिरसाळ्यातील नागरिक आणि वाहनचालक उपस्थित करत असून इंधन दर कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS