Homeताज्या बातम्या

शेतातील आलिशान बंगल्याचं कुलूप तोडून पोलिसांचा छापा

३३ लाखांची दारू जप्त

सोलापूर प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाने हिरज गावातील शेतात बांधलेल्या एका अलिशान बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख

डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे
आठ मंदिरांमध्ये चारी करणारी टोळी जेरबंद
अहमदनगर मर्चंटस् सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेची कारणे दाखवा नोटीस ; एक कोटी दंडाची टांगती तलवार

सोलापूर प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाने हिरज गावातील शेतात बांधलेल्या एका अलिशान बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख किंमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. सोलापूर – पुणे हायवे रोड ते हिरज रोडच्या बाजूस बंदिस्त अलिशान बंगल्यामध्ये धाड टाकून गोवा राज्यात विक्रीस असलेला आणि महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत बत्तीस लाख एकोणावीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी कोणीही मिळून न आल्याने गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरु आहे.

COMMENTS