Homeताज्या बातम्या

महागाईवरून काँगे्रसचा आक्रमक पवित्रा

नागपूर : देशातील वाढती महागाई, स्वयंपाकाच्या इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारवर जोर

कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार


नागपूर : देशातील वाढती महागाई, स्वयंपाकाच्या इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गावर वाढत्या आर्थिक भाराचा परिणाम होत असल्याचे म्हटले.
नागपुरात सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना धुराच्या चुलींपासून स्वच्छ इंधनाकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वाढत्या इंधनदरांमुळे आता अनेक कुटुंबांसमोर पुन्हा पारंपरिक चुलींचा वापर करण्याची वेळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सामान्य, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरगुती बजेट विस्कळीत होत आहे. वाढत्या खर्चामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरही सरकारवर निशाणा साधला. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद आणि निकषांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वीच्या योजनांतील अनेक पात्र लाभार्थी नव्या प्रक्रियेतून वगळले गेल्याचा दावा करत त्यांनी शेतकर्‍यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याची शंका व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफी योजनांमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष फायदा कितपत मिळेल, याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS