Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जगावर ‘हंता’ व्हायरसचं संकट; क्रुझवर मृत्यूचा थरार! भारत अलर्ट मोडवर, १६५ प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर तयारी सुरू!

कोरोनानंतर आता जगभरात 'हंता' नावाच्या एका नव्या विषाणूने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. एमव्ही होडियन्स क्रुझवर या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्या

वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये अंगावर लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
कोपरगाव शहरात नालेसफाई मोहिमेस प्रारंभ
हंता वायरस संकट: क्रूज शिप से निकाले गए यात्रियों को लेकर मैड्रिड रवाना हुआ  पहला व‍िमान

कोरोनानंतर आता जगभरात ‘हंता’ नावाच्या एका नव्या विषाणूने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. एमव्ही होडियन्स क्रुझवर या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांचा बळी गेला असून, यात दोन भारतीयांचाही समावेश असल्याने भारत सरकारची चिंता वाढली आहे.
एमव्ही होडियन्स या क्रुझवर हंता व्हायरसचा उद्रेक झाला असून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या जहाजावर दोन भारतीय क्रू मेंबर्स देखील होते. खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही भारतीयांना सध्या नेदरलँड्समध्ये ४५ दिवसांसाठी क्वारन्टाईन करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यात कोणतीही लक्षणं नाहीत, मात्र भारताने संभाव्य धोका ओळखून मोठी पावलं उचलली आहेत.
हंता व्हायरस नेमका पसरतो कसा? तर हा विषाणू प्रामुख्याने उंदरांच्या विष्ठा किंवा मूत्राच्या संपर्कात आल्याने पसरतो. विशेष म्हणजे, याचा ‘Andes strain’ हा प्रकार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरू शकतो, असा दावा केला जातोय. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रेड अलर्ट जारी केला आहे.
भारतात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही, परंतु केंद्र सरकार आणि आयसीएमआर (ICMR) आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. देशभरातील १६५ प्रयोगशाळांना हंता व्हायरसच्या निदानासाठी आणि संशोधनासाठी सज्ज करण्यात आले आहे. हाय लेव्हल बायोसर्व्हिलान्स प्रणाली सक्रीय करून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे.
विषाणू भारतात दाखल होऊ नये यासाठी विमानतळ आणि बंदरांवरही कडक पाळत ठेवली जाणार आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणं गरजेचं आहे.

COMMENTS