Homeताज्या बातम्या

एन.आय.एम.ए.च्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अशोक सानप यांची बिनविरोध निवड

राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटना (एन.आय.एम.ए.) बीड जिल्ह्याची बैठक उमेद अ‍ॅकॅडमी, बार्शी रोड, बीड येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत एन.आय.एम.ए.

मोफत आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजनश्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ.शितल भोपळे यांचा पुढाकार; 11 ते 16 मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन



राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटना (एन.आय.एम.ए.) बीड जिल्ह्याची बैठक उमेद अ‍ॅकॅडमी, बार्शी रोड, बीड येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत एन.आय.एम.ए.च्या बीड जिल्हाध्यक्षपदी डॉ. अशोक सानप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटना, छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकारी डॉ. सुधाकर मोहिते व डॉ. प्रशांत देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अशोक सानप, सचिवपदी डॉ. धनंजय देशपांडे तर कोषाध्यक्षपदी डॉ. दिनेश तुपे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रश्नांवर काम करण्याचा तसेच डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला. या बैठकीला डॉ. रमेश घोडके, डॉ. भुजंग थोरात, डॉ. अनिकेत कुलकर्णी, डॉ. लातूरकर, डॉ. राऊत, डॉ. बिर्ला, डॉ. कवडे, डॉ. गुंजाळ, डॉ. राहिंज, डॉ. मोहिते, डॉ. चरखा, डॉ. नहार, डॉ. बेदमुथा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर खाडे यांनी केले. प्रस्ताविक डॉ. राजाराम जाधव यांनी केले. तर शेवटी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS