Homeताज्या बातम्या

मोफत आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजनश्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम

सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने पाटोदा तालुक्यात दि. 4 जून ते 11 जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्

एन.आय.एम.ए.च्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अशोक सानप यांची बिनविरोध निवड
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ.शितल भोपळे यांचा पुढाकार; 11 ते 16 मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
नियोजित सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल 3D View | Sadguru  Moredada Charitable Hospital 3D



सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने पाटोदा तालुक्यात दि. 4 जून ते 11 जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण व सर्वरोग निदान शिबिर (आरोग्य सप्ताह) आयोजित करण्यात आला आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने तसेच युवासंत चंद्रकांत (दादासाहेब) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य सप्ताह राबविण्यात येत आहे. या शिबिरात वात, कफ, पित्त विकारांसह कान, नाक, घसा, सांधेदुखी, डोकेदुखी, अर्धांगवायू, त्वचारोग, पोटदुखी, महिलांचे आजार आदी विविध आजारांची मोफत तपासणी व निदान करण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. शिबिराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे : 4 जून – ईट, 5 जून – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, क्रांतीनगर, पाटोदा, 6 जून – दिघोळ, 7 जून – अंमळनेर, 8 जून – घुमरा पारगाव, 9 जून – धनगर जवळका, 10 जून – पारनेर, 11 जून – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, रस्ता गल्ली, पाटोदा या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी, पाटोदा तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS