Homeताज्या बातम्या

विश्वकर्मा परिवारातर्फे रविवारी शिर्डीत पुरस्कार वितरण; समाजरत्न आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

शिर्डी: विश्वकर्मा वंशीय समाज संघटनाच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेतर्फे रविवारी (दि. २८) सकाळी दहा वाजता निघोज (ता. राहाता) येथील शुभारंभ लॉन्समध्ये

एस टी कामगारांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल- नामदार शंकरराव गडाख
धुळमुक्त कोपरगावसाठी आ. काळेंचे मोठे योगदान : त्रिभुवन
अरे बापरे…24 जणांना ठोठावला तब्बल 82 कोटींचा दंड…
जय श्री विश्वकर्मा जी 🚩 , जय जांगिड़ सुथार समाज , जय श्री विश्वकर्मा , जय श्री अंगिरा ऋषि , #jangid , #suthar , #jangra , #vishwakarma, #अमावस्या

शिर्डी: विश्वकर्मा वंशीय समाज संघटनाच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेतर्फे रविवारी (दि. २८) सकाळी दहा वाजता निघोज (ता. राहाता) येथील शुभारंभ लॉन्समध्ये गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच समाजहितासाठी योगदान देणाऱ्यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात सकाळी दहा वाजता पिंपरी-चिंचवड येथील पोलिस उपआयुक्त गणेश इंगळे यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन सुतार, कार्याध्यक्ष अरुण भालेकर, सचिव विलास पवार, कोषाध्यक्ष गणेश गव्हाणे यांच्यासह राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात दहावी, बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय शैक्षणिक, आध्यात्मिक, कृषी, उद्योजकता, संरक्षण सेवा आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यंदाचे समाजरत्न पुरस्कार महादेव बोरुडे, पंढरीनाथ राजगुरू, अशोकराव जाधव, सुनील Lोंढे, सुभेदार हरी गोरे आणि युवराज दुधाळे यांना जाहीर झाले आहेत. तसेच संशोधक अर्जुन शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या किष्कींदा पांचाळ आणि महिला पत्रकार हर्षदा मिश्री यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

COMMENTS