Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात इंधनाची भीषण टंचाई कांद्याला भाव नाही, डिझेल मिळेना; ऐन पावसाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत

https://www.youtube.com/watch?v=usT9RjW3YeM महाराष्ट्रातून एक अत्यंत चिंताजनक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यावर आता इंधन टंचाईचे मोठे

NEET पेपर लीकवरून लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार! केंद्र सरकारविरोधात NSUI चा रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा!
निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा
बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा! मुख्याधिकार्‍यावर गुत्तेदार-अभियंत्याला वाचवण्याचा प्रयत्न; नगरपरिषद समोर जागरण गोंधळ आंदोलन लवकरच करणार-वर्षाताई जगदाळे

महाराष्ट्रातून एक अत्यंत चिंताजनक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यावर आता इंधन टंचाईचे मोठे संकट ओढवले असून, ठिकठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी हाहाकार माजला आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर ग्रामीण भागात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
राज्यात इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकू लागले आहेत. जिथे इंधन उपलब्ध आहे, तिथे नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये थेट हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच होरपळणारा सर्वसामान्य नागरिक आता या तुटवड्यामुळे पुरता हवालदिल झाला आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने वाहनचालकांचा संयम सुटत चालला आहे.

COMMENTS