Homeताज्या बातम्या

कुंडलवाडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

कुंडलवाडी: कै. के. रामलू साहेब प्रतिष्ठान, कुंडलवाडी व मुक्तांगण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० जून २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी १

फार्मर आयडीच्या तांत्रिक अडचणींवर तातडीने पर्याय काढा : बोरुडे
ज्येष्ठांसाठी १५ कलमी ’हक्क चार्टर’ लागू करा; डॉ. हंसराज वैद्य यांची केंद्र व राज्य शासनाकडे आग्रही मागणी
ED-CBI सारख्या यंत्रणा तुमच्याकडे असताना माझी भीती कशाची? शिरसाट भेटीवरून अभिजित दिपकेंचा भाजपवर थेट निशाणा

कुंडलवाडी: कै. के. रामलू साहेब प्रतिष्ठान, कुंडलवाडी व मुक्तांगण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० जून २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद नेत्र संस्थेचे तसेच मुधोळ येथील भोसले गोपाळराव पाटील नेत्र केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहणार आहे. नेत्रदोष, मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे शिबिर शिवम मंगल कार्यालय, खिडकी बेस, कुंडलवाडी येथे आयोजित करण्यात आले असून परिसरातील सर्व नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावार यांनी केले आहे. शिबिरासाठी येणार्‍या रुग्णांनी ओळखपत्रासाठी आपले शासकीय ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी उपलब्ध होत असल्याने परिसरातील नागरिकांनी या आरोग्यसेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS