Homeताज्या बातम्या

फार्मर आयडीच्या तांत्रिक अडचणींवर तातडीने पर्याय काढा : बोरुडे

श्रीगोंदा: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या लाभार्थी याद्यांतील शेतकऱ्यांना केवायसी प्रक

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या धाडींनंतरही नरसीत देहव्यापार सुरूच; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन
पातळगंगेचे पाणी दूषित; दुर्गंधीने वाढली आरोग्याची चिंता! पाणी स्वच्छ होईपर्यंत स्विमिंग टाळा: डॉ. मुंडे, डॉ. भुमे

श्रीगोंदा: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या लाभार्थी याद्यांतील शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घेतला असला, तरी केवायसी प्रक्रियेदरम्यान संबंधित पोर्टलवर तो दिसत नसल्याने लाभार्थी शेतकरी संभ्रमात पडले असून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रीगोंदा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादितचे चेअरमन सुनील बोरुडे यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक सभासदांनी शासनाच्या सूचनेनुसार फार्मर आयडी तयार केला आहे. मात्र केवायसी करताना पोर्टलवर तो उपलब्ध होत नसल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी पात्र लाभार्थी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी तसेच डिजिटल प्रक्रियेची मर्यादित माहिती असलेल्या सभासदांना या तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसत आहे. वारंवार सेवा केंद्रांवर फेऱ्या मारूनही प्रश्न सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने संबंधित पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय केवायसी पूर्ण करता येईल, यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चेअरमन सुनील बोरुडे यांनी केली आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

COMMENTS