बंगळूरू : साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रकाश राज यांनी एक गंभीर आणि धक्कादायक दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, एसआयआर प्रक्रियेनंतर बंगळूरू
बंगळूरू : साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रकाश राज यांनी एक गंभीर आणि धक्कादायक दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, एसआयआर प्रक्रियेनंतर बंगळूरू मतदारसंघातील व्होटर लिस्टमधून आपले नाव हटवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. प्रकाश राज यांनी व्हिडीओत म्हटलं की, ‘चांगला जोक आहे, असंच सुरु ठेवा’, असं म्हटलं आहे. सध्या प्रकाश राज यांनी केलेला धक्कादायक दावा पाहून, नेटकऱ्यांनाही शॉक बसला. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. प्रकाश राज यांनी अलिकडेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. प्रकाश राज यांनी या व्हिडीओत, व्होटिंग लिस्टमधून नाव काढून टाकण्याच्या प्रक्रियेला ‘एक मोठा विनोद’, असं म्हटलं आहे. ‘डिअर फ्रेंड्स.. साथिओं.. मला एक जोक तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. SIR प्रक्रियेनंतर बंगळूरू मतदारसंघातील व्होटिंग लिस्टमधून माझं नाव हटवण्यात आलं आहे. चांगला विनोद आहे ना…’, असं प्रकाश राज म्हणाले. ‘माझा या मतदारसंघात जन्म झाला. मी इथे राहतो, शिक्षण आणि नाटकाचे धडेही मी इथेच गिरवले, आणि तुमच्या माहितीकरिता, मी या ठिकाणी लोकसभा निवडणूकही लढवली. छान. बघू आता माझे मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी मला कोणती कागदपत्रे गोळा करावी लागतील. कोणकोणती कागदपत्रे दाखवावी लागतील? बघू..’ यावेळी त्यांनी आवाहनही दिले. ‘गेम ऑन..ते लोक पॉवर दाखवण्यासाठी हे सगळं करु शकतात. मतदान करण्याचं हक्कही तुम्ही हिसकावून घेऊ शकता. पण तुम्हाला सत्तेतून हटवण्यासाठी आमच्या शक्तीला काढून घेऊ शकता का?’, असंही प्रकाश राज म्हणाले. व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘जरी तुम्ही काही नागरिकांचे मतदान करण्याचा अधिकार हिसकावून घेऊ शकता, जे तुम्हाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी कदाचित मतदान करणार नाहीत. पण तुम्ही ज्या सत्तेच्या खुर्चीवर आहात, तिथून तुम्हाला खाली खेचण्याच्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही रोखू शकाल का?’, असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या प्रकाश राज यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

COMMENTS