Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणार्‍या महिलेचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या त

रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग
मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैनवर अफरातफरीचा गुन्हा
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी ः खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणार्‍या महिलेचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या तरुणाविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. शनिवारी (1 एप्रिल) सकाळी ही घटना घडली. जनार्धन वाघमोडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फिर्यादी महिला या शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात. त्या ड्यूटीला जात असताना जनार्धन त्यांचा पाठलाग करीत होता. ही घटना जुलै 2022 मध्ये घडली होती. त्यावेळी फिर्यादीने त्याला समजून सांगून झाला प्रकार तेथेच सोडून दिला होता. त्यांनी तक्रार दिली नव्हती. दरम्यान, शनिवारी (दिनांक 1 एप्रिल) सकाळी साडे नऊ वाजता फिर्यादी हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर जात असताना जनार्धनने त्यांचा पाठलाग केला व त्यांना रस्त्यावर गाठून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर फिर्यादी ड्यूटीवर गेल्या. त्यांनी तेथून जनार्धनच्या वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वडिलांना सांगितल्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीला फोनवर शिवीगाळ केली. फिर्यादी सायंकाळी ड्यूटीवरून परतल्यानंतर त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करीत आहेत.

COMMENTS