Homeक्रीडा

आयपीएल खेळाडू अभिषेक पोरेलला बलात्कार प्रकरणात अटक; लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याचा गंभीर आरोप

कोलकाता : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. हुगळी पोलिसांनी 23 वर्षी

कोतवाली पोलिसांवर सूराधारी तरुणाची दहशत
मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणार्‍या महिलेवर गुन्हा
रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करणार्‍या वाहन चालकावर गुन्हा
क्रिकेट विश्वात खळबळ! क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या 'ते' प्रकरण अंगाशी,  तात्काळ अटक करण्याचे आदेश जारी | Kolkata High Court arrest order for  cricketer Abishek Porel ...

कोलकाता : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. हुगळी पोलिसांनी 23 वर्षीय यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या अभिषेक पोरेल याला सोमवारी रात्री अटक केली. वैद्यकी शिक्षण घेणाऱ्या कर्नाटकातील एका विद्यार्थिनीने पोरेलविरोधात बलात्कार, लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, तिची आणि अभिषेक पोरेलची ओळख जानेवारी 2023 मध्ये झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि जवळपास तीन वर्षे त्यांचे संबंध होते. महिलेने आरोप केला आहे की, पोरेलने लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याचबरोबर त्यांच्या खासगी क्षणांचे रेकॉर्डिंग केल्याचाही दावा तिने तक्रारीत केला आहे. तक्रारीनुसार, 2 एप्रिल 2026 रोजी दिल्लीमध्ये कथित घटना घडली. गेल्या वर्षभरात दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर पोरेलने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. लग्नाच्या आश्वासनावरूनही दोघांमध्ये वाद झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तरुणीने पोरेलवर जवळ राहण्यास परावृत्त करणे आणि अन्न, जेवण न देण्यासारखे असेही काही आरोप केले आहेत. या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने पोरेलच्या अटकेचे निर्देश दिले होते. इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात केले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर पोलीस अनेकदा अभिषेकच्या चंदननगर येथील निवासस्थानी पोहोचले होते. परंतु अभिषेक त्याच्या घरी एकदाही आढळून आलेला नव्हता. अभिषेक पोरेलने यापूर्वी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावलेले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. अभिषेकवरील कोणतेही आरोप सध्या सिद्द झालेले नाहीत. परंतु सध्या त्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोरेल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. तर आयपीएल 2026 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून चार सामने खेळले होते.

COMMENTS