Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवविवाहीत दाम्पत्यासह चौघांचा मृत्यू

नाशिक ः जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम

छत्तीसगडमधील बालोद येथे कारने चिरडल्याने तीन मित्रांचा मृत्यू
कांगोणी फाटा परिसरात ट्रॅक्टर-बसची भीषण धडक; एकाचा मृत्यू
वसमत पं. स.चे माजी सभापती प्रकाश ढोणे यांचा नांदेडजवळ अपघाती मृत्यू
Sinnar Panchale Accident: Truck-Jeep Collision Claims Lives


नाशिक ः जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम्पत्यासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक महिला जीपमधून बाहेर फेकली जाऊन गतप्राण झाली. यात 7 जण जखमी झाले. गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणार्‍या पंचाळेतील आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला. गाव दीड किमीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातप्रकरणी ट्रकचालक अशोक काळे (रा. जुन्नर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS