नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आसना पुला वरून खाली उतरत असताना दुचाकी स्लिप होऊन पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्य

नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आसना पुला वरून खाली उतरत असताना दुचाकी स्लिप होऊन पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
वसमत येथून नांदेड कडे येत असताना पुलावरून खाली उतरत उतरतो उचलत असताना दुचाकी स्लिप झाली यात वसमत जि. परभणी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश शेषराव ढोणे पाटील वय 65 रा. ठोणी पांगरा ता.पूर्णा यांना गंभीर दुखापत झाली उपचारासाठी उपस्थित नागरिकांनी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली .पोलिस निरीक्षक शेंडगे व त्यांच्या सहका-यांनी जखमी ढोणे पाटील यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे .घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत परिसरासह नांदेड शहरातील अनेकांनी त्यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. वसमत चे आमदार राजू नवघरे यांचे ढोणे पाटील हे मामा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .सदर दुर्घटनेबाबत विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS