Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरूवातवी. डी. सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तिरुवनंतपुरम : केरळच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वी.डी. सतीशनयांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिरुवनंतपुरम

नायब सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या वर्षाताई शेरकर यांचा सन्मानपरिवर्तनवादी व्यसनमुक्ती लढ्यात सदैव सोबत-अ‍ॅड. सतीश शिंदे
राज्यात पावसाची दमदार हजेरी


तिरुवनंतपुरम : केरळच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वी.डी. सतीशनयांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर संयुक्त लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने अधिकृतपणे राज्याची सूत्रे हाती घेतली.
मुख्यमंत्री सतीशन यांच्यासह मंत्रिमंडळातील 20 मंत्र्यांनीही एकाच वेळी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या 11 सदस्यांसह इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या पाच प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. तसेच आघाडीतील इतर सहयोगी पक्षांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँगे्रस नेते खा. राहुल गांधी वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध राज्यांतील काँग्रेसशासित सरकारांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहिले. काँग्रेसकडून रमेश चेन्निथला, सन्नी जोसेफ, के. मुरलीधरन, ए. पी. अनिल कुमार, पी. सी. विष्णुनाथ, टी. सिद्दीकी, बिंदू कृष्णा, के. ए. तुलसी, रोजी एम. जॉन, एम. लिजू आणि ओ. जे. जनीश यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून पी. के. कुन्हालीकुट्टी, एन. शमसुद्दीन, के. एम. शाजी, पी. के. बशीर आणि वी. ई. अब्दुल गफूर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पक्षाचे शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेस (जेकब) चे अनूप जेकब आणि कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचे सी. पी. जॉन यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळातील 14 सदस्यांनी प्रथमच मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. नव्या चेहर्‍यांना संधी देत सरकारने अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. विधानसभेतील अध्यक्षपद काँग्रेसकडेच ठेवण्यात आले असून तिरुवनचूर राधाकृष्णन यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शनिमोल उस्मान यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभेतील आमदारांच्या शपथविधीनंतर 22 मे रोजी अध्यक्षपदाची औपचारिक निवड होणार आहे.

COMMENTS