Homeताज्या बातम्याबीड

नामांकित हमदर्द कंपनीकडून औषधींची बेदर्द भाव वाढपन्नास टक्क्यांनी वाढलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार

देशातील नामांकित कंपनी हमदर्द ने औषधींच्या भावात बेदर्दपणे भाव वाढ केली आहे. पन्नास टक्क्यांनी वाढविण्यात आलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणा

वक्फ सेवा इनाम जमिनीवरील अनधिकृत पत्र्याचे शेड हटविण्याची मागणीकलीम अहमद शेख यांचे प्रशासनाला निवेदन
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला गवळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसादतहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रत्यक्ष भेट; घरपोच गणना प्रपत्र वाटप करून मतदारांना केले जागृत
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ.शितल भोपळे यांचा पुढाकार; 11 ते 16 मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन



देशातील नामांकित कंपनी हमदर्द ने औषधींच्या भावात बेदर्दपणे भाव वाढ केली आहे. पन्नास टक्क्यांनी वाढविण्यात आलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार असून कंपनीने वाढीव दराचा फेरविचार करून माफक दर ठेवावे असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
आपल्या भारत देशात दर्जेदार औषधी तयार करणारी कंपनी म्हणून हमदर्द कंपनीला ओळखले जाते. पुर्वी या कंपनीकडून निर्माण होणार्‍या औषधी, गोळ्या रूग्णांना वाजवी दरात मिळायचे. पण अलीकडच्या काळात गेल्या काही वर्षांपासून हमदर्द कंपनीकडून तयार होणार्‍या औषधी-गोळ्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, नॅचरोपॅथी चे डॉक्टर्स रुग्णांना मोठ्या प्रमाणात लिहून देत असल्याने बाजारपेठेत नेहमी हमदर्द कंपनी च्या औषधी-गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. बहुतेक या तुटवड्याचीच नोंद घेऊन की काय कंपनीने गोळ्यांच्या दरात चक्क पन्नास टक्क्यांनी वाढ केली आहे. ख़ुर्स कुश्ता मरजन जवाहर वाला या वीस छोट्या गोळ्या असलेल्या एका छोट्याशा बाटलीची किंमत जी सहा महिन्यापूर्वी 70 रुपये होती, ती आता चक्क 100 रुपये करून टाकली आहे. ही गोळी हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी परिणामकारक असल्याने तिचा बाजारपेठेत नेहमी तुटवडा असतो. यामुळे या गोळीचे सेवन करणारे रुग्ण अगोदरच मेटाकुटीला येतात. त्यात पुन्हा आता याचे दर चक्क पन्नास टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. यामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार आहे. याचा विचार करून कंपनीने सर्व औषध-गोळ्यांचे दर माफक ठेवावेत. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.

COMMENTS